Sale!

व्हिन्सेंट व्हान गॉग

375.00

व्हिन्सेंट व्हान गॉग ह्या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या जीवनावर आधारीत ‘लस्ट फॉर लाईफ’ ही आयर्व्हिंग स्टोन यांची मूळ इंग्रजी कादंबरी. तिचा हा स्वैर अनुवाद. व्हिंसेंटनं स्वतः बद्दल, चित्रकला, भोवतालची माणसं आणि निसर्ग वैगेरे त्याला जाणवणाऱ्या गोष्टींबद्दल खूप मोकळेपणानं लिहलंय.

Compare
Category:

Average Rating

1 Star
0%
2 Star
0%
3 Star
0%
4 Star
0%
5 Star
0%

1 review for व्हिन्सेंट व्हान गॉग

 1. Ajay Samgir

  यंदाची “अक्षरधारा” पुस्तकालयातील खेप विशेष ठरली. मराठी अनुवादित विभागमधून “द रीडर” उचलली. शेवटच्या रो मधे फेरफटका मारताना पुरंदरे प्रकाशन यांचं “विन्सेंट वान गोग” सापडलं. हे अनपेक्षित होतं. एका चित्रकारावर लिहिलेल्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद!

  राइग्ज म्युझियमला फेरफटका मारताना विन्सेंट वान गोग नावाचं संग्रालय नेहमी दिसतं. पण कधी आत जायचा विचार केला नाही. पॅरिस नंतर द हेग, आमस्टरडॅम ही शहरं कलाकार विशेषतः चित्रकार मंडळींचं वास्तव्य असणारी शहरे असल्यामुळे इथे खूप संग्रालये आहेत. त्यामुळे वान गोग त्यातलंच एक समजून एवढं लक्ष दिलं नव्हतं.

  नेदरलँडला परत आल्यावर “द रीडर” संपवली आणि वान गोग् वाचायला घेतली. संथ सुरू झालेला कथानक हळूहळू आपल्याला गुंतवून घेतो. वान गोगमधे कुठेतरी आपण स्वतःला पाहतो. कधीतरी आपल्याला पडणारे प्रश्न हे त्याला पण पडलेले असतात.

  वान गोग जे डच इतिहासात प्रतिष्ठा मिळवलेले आडनाव. त्यातून जगातली किमती चित्रे विकण्याचा त्यांचा व्यवसाय अठराव्या शतकात विशेष गाजलेला. पण शांत, साधा आणि सरळ स्वभावाचा काहीसा एकलकोंडा विन्सेंट वान गोग यांच्यातून वेगळी वाट निवडतो. आयुष्यात घडत जाणारी एक एक घटना त्याला सगळ्यापासून वेगळा बनवते.

  एके काळी बायबल वाचून देवकार्य करायला बाहेर पडलेला हा तरुण जेव्हा खाणकामगार, शेतकरी लोकांचे आयुष्य त्यांच्यात मिसळून जगून बघतो तेव्हा त्याला त्याचा देव भलत्याच ठिकाणी सापडतो. अशा ठिकाणी जिथं धर्मगुरू स्वतःला उभं राहणं पण निषिद्ध मानतात.

  कष्टकरी, पीडित लोकांच्यात एकरूप होऊन आयुष्यातला चंगळवाद बाजूला पडलेला असताना त्याच्या हातात ब्रश आणि समोर कॅनव्हास येतो. तिथून पुन्हा नवीन मार्ग …. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे याची जाणीव होते. स्वतःला चित्रकलेत झोकून देऊन तो दिवस रात्र पीडित लोकांची वास्तववादी चित्र करतो. आयुष्यातलं जगणं दिवसेंदिवस बिकट होत जातं. लहान भाऊ पोटाला चिमटा घेऊन त्याला सांभाळतो. त्याच्यातला कलाकार जिवंत ठेवतो. वेळ पडते तेव्हा दोघेही उपाशी झोपतात. युरोपमधल्या सर्व चित्रकार लोकांची अवस्था थोड्याफार फरकाने अशीच असते.

  प्रस्थापितांना किमान चित्र विकून पैसे आणि समाधान मिळत होतं. पण नवख्या, तरुण आणि क्रांतिकारी चित्रकारांना मात्र त्यांच्या “इम्रेशनिश्ट्” धोरणामुळे कवडीची किंमत मिळत नसते. रात्रंदिवस मेहनत करून लागलेला कॅनव्हासचा ढीग आधुनिक काळातली मांडलेली वास्तववादी विचारसरणी, राजकीय सामाजिक धोरणवरचे बंड या गोष्टी सत्ताधारी, प्रस्थापित साहित्यिक ते सामान्य जनता यापैकी कोणालाच रुचत नव्हत्या.

  विन्सेंट याच गर्दीचा भाग होता. त्याने दाखवलेल्या कष्टकरी लोकांच्या वेदना कोणाला रुचत नव्हत्या. धनाढ्य लोकांना आवडावी अशी कलाकृती तयार करण्यात त्याला रस नव्हता. प्रयत्न करूनही त्याची चित्र बाजारात विकली जात नव्हती. साहजिकच आयुष्यात उपासमार, अतिश्रम त्यामुळे आजारपण येत जात होतं.

  सूर्य आणि शेतीचं आकर्षण त्याला आर्ल प्रांतात घेऊन जातं. युरोपच्या गुलाबी थंडीत वाढलेलं शरीर तिथली हवा आणि कडाक्याचं ऊन सहन करू शकत नव्हतं. पण कलाकाराला कलेपुढं सर्वकाही दुय्यम असतं. तो चित्र करत राहिला. हळू हळू त्याच्या चित्रांची प्रशंसा होऊ लागली. पण चित्र विकून चरितार्थ चालवण्यात त्याला यश आले नाही. सतत उपासमार, काळजी अभावी कमजोर झालेल्या शरीरावर आर्लचे वातावरण शिरजोर झाले. त्याला वेडाचे झटके येऊ लागले. तिथल्या लोकांमध्ये हा सामान्य आजार होता. पण विन्सेंट जगावेगळा म्हणून त्यावर कारवाई झाली, वेड्यांच्या इस्पितळात जावं लागलं. त्याने तिथं पण वास्तववादी चित्र केली. वेड्या लोकांच्यात सहज मिसळला. वेड्यांचा फक्त त्रास होतो पण उपद्रव होत नाही हा अनुभव त्याला मिळाला.

  थोड्या दिवसात तो वेडा नाही ही शहाण्या लोकांची खात्री पटल्यावर तो पॅरिसला परतला. पण तो शेवटी कलाकार होता. सामान्य आयुष्य जगणं यांच्या नशिबात फार कमी असतं. त्याने एक दिवस शेवटचं चित्र केलं आणि इच्छा मरण मेला. पण कलेला मरण कुठं असतं? तो आजही आहे. त्याच्या चित्रांमधली वास्तविकता त्याच्या मरणोत्तर का होईना लोकांना समजली. राईग्ज पासून कितीतरी मोठमोठ्या संग्रालयात आजही त्याची चित्र आहेत. आजही त्याची चित्र कित्येक लोकांचा संशोधनाचा विषय आहे पण हे सगळं झालं तर त्याने जग सोडल्या नंतर… तो जिवंत असताना त्याचं फक्त एक चित्र विकलं गेलं. आज आमस्टरडॅम सारख्या शहरात राईग्ज संग्रालयासमोर त्याचं संग्रालाय उभं आहे पण एके काळी पॅरिसच्या खानावळीत स्वतःच्या घरात स्वतःच्याच समाधानासाठी त्यानं भिंतीवर चित्र लावली.

  भेटलेल्या अल्पायुषात त्याने भावाला हजारो पत्रं लिहिली त्यातून ही कादंबरी उभी राहिली. त्याने केलेल्या चित्रामधून हे संग्रालय उभं राहिलं. एखाद्या कलाकाराचे चरित्र वाचून त्याच्या वास्तूला भेट द्यायची माझी ही पहिलीच वेळ. अनुभव विलक्षण होता.

  गेल्या दोन आठवड्यात पुस्तक वाचत असताना इथल्या कित्येक लोकांना विन्सेंट वान गोग बद्दल विचारलं. त्याचं नाव माहीत नाही असा एकही माणूस भेटला नाही. त्याच्या चित्रांसमोर उभं राहिल्यावर पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन तंतोतंत आठवते. मराठीतला अनुवादसुद्धा अप्रतिम आहे.

  पुस्तक आयुष्याबद्दल अनेक जाणीवा करून देतं. पैशाशिवाय श्रीमंत आयुष्य जगता येतं हे शिकवतं. कलाकाराचे वेगळेपण दाखवून देतं. आठराव्या शतकातली पॅरिस, आमस्टरडॅम ही शहरं दाखवतं. या शहरांना आधुनिकीकरण, व्यक्तीस्वातंत्र्य आणि श्रीमंती लाभली यात कलाकारांचा वाटा किती मोठा आहे हे दाखवतं.

  – अजय समगीर

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *