नोंदणी योजनेचा लाभ:
* राजा शिवछत्रपति
* स्टोरीटेल अॅप ३ महिन्यांसाठी
* इतर डिस्काउंट कूपन
पुरंदरे प्रकाशनाची खजिन्यावर खजिना देणारी राजा शिवछत्रपति नोंदणी योजना!
बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेला “राजा शिवछत्रपति” हा प्रेरणादायी ग्रंथ प्रत्येक मराठी माणसाच्या संग्रही असायलाच हवा यासाठी पुरंदरे प्रकाशन नेहमीच प्रयत्नशील राहते. सर्वसामान्यांना सहज विकत घेता येईल अशा किंमतीत अतिशय आकर्षक योजनांद्वारे या ग्रंथाची नोंदणी करून पुरंदरे प्रकाशनाने आजवर “राजा शिवछत्रपति” ग्रंथाच्या विक्रीचे अनेक विक्रम मोडले आहेत. पुरंदरे प्रकाशन अशीच एक विलक्षण योजना घेऊन येत आहे कि ज्यामध्ये शिवप्रेमींना खजिन्यावर खजिना मिळाल्याचा आनंद होणार आहे.
योजना….
“राजा शिवछत्रपति” या १०२८ पृष्ठाच्या ग्रंथाची मूळ किंमत आहे रुपये १२५०/- आगावू नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला हा ग्रंथ सवलतीत फक्त रुपये ७००/- मध्ये उपलब्ध होणार आहे. याशिवाय प्रत्येक नोंदणी करणाऱ्या शिवप्रेमींना “स्टोरीटेल” या आंतरराष्ट्रीय ऑडिओबुक्स अँपचे रु ७९९/- किंमतीचे तीन महिने वापरता येईल असे गिफ्टकार्ड भेट मिळणार आहे. यामुळे स्टोरीटेल अँपवरील २ लाखाहून अधिक ऑडिओबुक्स चा खजिना प्रत्येकाला उपलब्ध होणार आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसह अकरा भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स असणार आहेत. पण सर्वात महत्वाचे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांची १९८३ साली ध्वनीमुद्रित केलेली पंधरा भागाची संपूर्ण शिवचरित्रकथन व्याख्यानमाला त्यांच्या प्रेरणादायी आवाजात स्टोरीटेल वर ऐकता येणार आहे. याशिवाय त्यांनी सांगितलेल्या हिरकणी, प्रतापराव गुजर, बुलंद बुरुज अशा ऐतिहासिक सात कथाही स्वतंत्रपणे ऐकायला मिळणार आहेत.
स्टोरीटेलविषयी काही….
स्टोरीटेल हि स्विडिश कंपनी असून स्टोरीटेल ही जगातील २१ हुन अधिक देशात आणि २५ हुन अधिक भाषेत ऑडिओबुक प्रकाशित व वितरित करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. सध्या भारतात मराठी, हिंदी, इंग्रजी आदी भाषांसह ११ भारतीय भाषांतील पुस्तके या अँपवर उपलब्ध आहेत. ही ऑडिओबुक्स कधीही कुठेही आणि कितीही ऐकता येऊ शकतात. मराठी मध्ये शिवचरित्र कथन बरोबरच इतिहास प्रेमींसाठी ना. स. इनामदार यांच्या झेप , झुंज अश्या कादंबऱ्या , गो. नि. दांडेकर यांच्या पडघवली, पवनाकाठचा धोंडी, कुण्या एकाची भ्रमणकथा , शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय , युगंधर यासारख्या लोकप्रिय कादंबऱ्या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहेत.